ग्राहक पंचायत
महाराष्ट्र
ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र, पुणे
“ग्राहक जागरण आणि प्रबोधन” अभियान
”माझे घर आणि गृहकर्ज” - लेख क्र. (१४)
मोफा कायदा – कलम क्र. (१७) आणि (१८)
‘मोफा” कायद्यातील विविध
तरतुदींची ओळख करून घेण्यास आपण सुरुवात केली आणि आजच्या लेखाद्वारे आपण त्याच्या
समाप्तीपर्यंतचा प्रवास पूर्ण करीत आहोत. ह्या कायद्यातील एकंदर १८ कलमांची ओळख
अशा प्रकारे आज रोजी पूर्ण होत आहे.
SECTION – 17 – APPLICATION OF CERTAIN PROVISIONS TO FLATS ALREADY IN
EXISTENCE
….. Since the provisions of this
section is out of context today, not discussed here.
SECTION – 18 – ACT NOT TO APPLY TO THE MAHARASHTRA HOUSING & AREA DEVELOPMENT AUTHORITY & BOARDS ESTABLISHED
UNDER THE MAHARASHTRA HOUSING & AREA DEVELOPMENT ACT, 1976.
- विनम्र निवेदन –
आजवर मोफा कायद्यातील विविध
तरतुदींची जी चर्चा आपण “ग्राहक जागरण आणि प्रोबोधन अभियान” ह्या उपक्रमाद्वारे
केली ते केवळ कायद्याविषयीचे सर्वसामान्य ज्ञान / माहिती ग्राहक चळवळीशी संबंधित
आपल्या साहोदारांना व्हावी ह्याच उद्देशाने. मोफा कायद्याच्या तरतुदी म्हाडा च्या
तर्फे ज्या सदनिका विकण्यात येतात त्यास लागू होत नाही, कारण म्हाडा साठी
स्वातंत्र्य कायदा अस्तित्वात आहे. आजवरच्या लेखमालेत काही चुका अनवधानाने राहून
गेल्या असतील तर तो सर्वस्वी माझा दोष आहे हे विनम्रपणे सांगू इच्छितो.
ह्या नंतरच्या काही लेखात “माझे घर आणि गृहकर्ज”
ह्या विषयाशी संबंधित विविध जिल्हा मंच, विविध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे ह्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निवडक
आदेशांचा संक्षिप्त स्वरूपात परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.