Donate Us - Grahak Margdarshan

STAY CONNECTED

Donate Us


जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, सिद्ध हस्त लेखक , योग मार्गावरील सिद्धी प्राप्त साधक , कुशल संघटक, भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, “अखिल भारतीय ग्राहक पंचायत” चे “संस्थापक” आणि “ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक” “स्व.बिंदुमाधव जोशी” यांच्या प्रेरणेने व त्यांनी घालून दिलेल्या तत्वावर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत, महाराष्ट्र” हि संस्था 2010 मध्ये नोंदणीकृत होऊन ग्राहकहितासाठी कार्यरत आहे.

ग्राहक संघटन, प्रबोधन व ग्राहकांचे मार्गदर्शन या मुख्य सूत्रावर महाराट्र राज्यभर असंख्य कार्यकर्ते संस्थेच्या तत्व प्रणालीला जीवनव्रत मानून कार्य करीत आहेत. ग्राहकांचे शोषणापासून सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे हक्कासोबत कर्त्यव्याबाबतही जागरूकता निर्माण करण्याचे व्रत समाजशरण वृत्तीने, निरलस व निरपेक्ष भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते तालुका पातळी पर्यंत जोडले आहेत. ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी शिबीर , व्याख्यान , परिषदा, मेळावे, यांचे आयोजन तसेच व्हाट्सअँप, ब्लॉगर, फेसबुक पब्लिक ग्रुप, सारख्या आधुनिक साधनांचा उपयोग करीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र व स्वायत्त व्यासपीठ निर्माण केले आहे.

शोषणमुक्त समाज निर्मितीचे ध्येय घेऊन कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेस हे कार्य ऊर्जस्वल ठेवण्यासाठी आपल्या वैचारिक व आर्थिक सहकार्याची गरज आहे.आपण हि मदत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग ने करू शकता.




आपली मदत संस्थेच्या उद्दिष्ट पूर्ती साठी गरुडभरारीचे बळ देणारी ठरू शकते. यापूर्वीही प्रसंगोपात समाजाने ग्राहक संघटन , प्रबोधन व मार्गदर्शन या कार्यासाठी भरभरून सहकार्य केले आहेच. देशाच्या आर्थिक व्यवहारातील ग्राहकरूपी कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी चालविलेला यज्ञात आपली अर्थरूपी समिधा दातृत्व भावनेने समर्पित करण्यासाठी हे विनम्र आवाहन.

आपला
डॉ. विजय लाड
अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र
http://www.grahakpanchayat.com/
Facebook Group: grahakmargdarshan