Sunday, 21 May 2017

सिझेरियन आणि नॉर्मल

▪ " सिझेरियन आणि नॉर्मल "▪
 

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, (अधिकृत प्रतिनिधी पुणे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटना) -

सिझेरियन आणि नॉर्मल डिलिव्हरीबद्दल प्रसिद्ध झालेल्या या (अशास्त्रीय) लेखामुळे सामान्य जनता तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांमध्ये खळबळ माजली आहे.
मुळातच मानवी प्रसूती ही सोपी आहे ही मोठी गैरसमजूत आहे. जेव्हा मानव चार पायांवर चालत होता तेव्हा प्रसूती सोपी होती. माणूस जसा जसा दोन पायांवर चालायला लागला तसा तसा माकडहाडाचा आकार आणि त्यामुळे प्रसूतीमार्गातील हाडांचा आकार आकुंचन पावत गेला. त्याबरोबरच माणसाच्या बुद्धीच्या वाढीबरोबरच माणसाच्या बाळाच्या डोक्याचा आकार वाढत गेला. या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून मानवी प्रसूती जास्त जास्त कठीण होत गेली. पूर्वी बाळाचे जास्त वजन असलेल्या स्त्रिया बाळंतपणातच दगावत असत त्यामुळे जास्त वजनाची बाळे होत नसत. सिझेरियन सुरू झाल्यापासून या स्त्रिया जगू लागल्या आणि बाळांची वजने वाढत गेली. ही शास्त्रीय माहिती बर्याच जणांना नसते म्हणून गैरसमज! ‘मानवी प्रसूती’ ही जर इतकीच सहज व सोपी आणि नैसर्गिक गोष्ट असेल तर  इतक्या मोठय़ा प्रमाणावर आतार्पयत माता-बालक मृत्यू प्रमाण का होते याचे स्पष्टीकरण लेखकाने द्यावयास हरकत नसावी. आज 21 व्या शतकातही माता बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यास शासन धडपडत आहे. पूर्वीच्या काळात बाळंतपण स्त्रीचा दुसरा जन्म समजला जायचा हे आपण सोयीस्करपणो विसरलो आहोत का? माता-बालमृत्यू कमी होण्यामागे स्त्री रोगतज्ज्ञांचे यश आहे असे वाटत नाही का?
कोणत्याही क्षेत्रात वाईट प्रवृत्तीची माणसे असतातच. मग डॉक्टरांमधल्या काही मुठभर वाईट लोकांमुळे सगळ्या डॉक्टर समाजावर माध्यमांचा रोष का असावा? स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र हे वैद्यकीय क्षेत्रंमध्ये सर्वाधिक जिकिरीचे आणि धोक्याचे क्षेत्र समजले जाते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातसुद्धा नुकतीच प्रसूती झालेल्या स्त्रीला अति रक्तस्त्रव सुरू झाला तर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या हातात तिला वाचवण्यासाठी फक्त दोन-एक मिनिटेच असतात. इतर वैद्यकीय क्षेत्रंमधील रुग्ण हे खरोखरीच रुग्ण असतात. त्यांना कोणतातरी आजार झालेला असतो. आमचे रुग्ण हे ब:यापैकी निरोगी असतात. अशावेळी प्रसूतीतील गुंतागुंत तसेच बाळाच्या तब्येतीची काळजी असे सगळे ओङो स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्या खांद्यावर वागवत असतात.
बाळ आणि आई सुखरूप घरी पाठवणो हा आमच्या आनंदाचा भाग असतो. या क्षेत्रत आम्हाला पेशंट आणि नातेवाइकांकडून खूप प्रेम, स्नेह आणि जिव्हाळाही मिळतो हे मान्यच करायला हवे पण काही गुंतागुंत झाल्यास आमची भूमिका समाजाने समजावून घ्यावी ही अपेक्षा चुकीची आहे का?
या लेखात मांडलेल्या एकेका मुद्याबद्दल आमचे म्हणणे असे-

बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे असणे :

बाळ आईच्या गर्भाशयात गर्भजलामध्ये तरंगत असते, त्याचवेळी त्याच्या हालचाली पण चालू असतात अशा वेळी या हालचालींमुळे कधी कधी नाळेचे वेढे बाळाच्या गळ्याभोवती पडतात. अशा केसेसचा भरपूर प्रमाणात अभ्यास झालेला आहे. या अभ्यासपूर्ण निरीक्षणांमधून असे लक्षात आले आहे की, अशा रुग्णांमध्ये एकदा कळा सुरू झाल्या की बारकाईने बाळाच्या ठोक्यांकडे लक्ष ठेवणो गरजेचे आहे. कळा सुरू होऊन बाळाचे डोके प्रसूतीमार्गातून खाली जाऊ लागले तर कधीकधी हे नाळेचे वेढे आवळले जातात आणि बाळ गुदमरू शकते.
दुसरे म्हणजे हे नाळेचे वेढे कधी कधी बाळाचे डोके खालीच जाऊ देत नाहीत. बाळाचे डोके पूर्ण दिवस भरलेले असताना खाली आलेच नाही तर नॉर्मल डिलिव्हरी होऊच शकत नाही. नाळेचे वेढे 2-3 असतानाही नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते हे ही खरे आहे पण खूप काळजीपूर्वक प्रसूती करायला लागते व धोकादायक ठरू शकते हे ही तितकेच खरे.

पाणी कमी असणे:-

पाणी कमी असण्याचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात पाण्याची पिशवी फुटल्यामुळे पाणी कमी होते. अशा वेळी सहा तासात आपोआपच कळा सुरू होऊ शकतात. न झाल्यास कळा सुरू होण्याची औषधे देता येतात. पण मुळात कळा सुरू होण्याच्या आधी पाण्याची पिशवी फुटणो ही काहीतरी बरोबर नसल्याची खूण असते. ब:याच वेळा बाळाचे डोके प्रसूतीमार्गात खूपच वर असते.
दुसरे म्हणजे एकदा पाण्याची पिशवी फुटली की पेशंटची चोवीस तासात प्रसूती केलीच पाहिजे हा प्रसूतीशास्त्रचा नियम आहे. अन्यथा बाळ आणि आई दोघांचेही आरोग्य धोक्यात येते. कळा सुरू झाल्यावर गर्भजलाचा उपयोग कळांचा दाब बाळावर पडू नये याकरिता असतो. पाणी कमी झाल्यास कळांचा दाब बाळावर येऊन बाळ गुदमरू शकते.. आणि या सर्व संकल्पना जगन्मान्य आहेत. दुसरा प्रकार म्हणजे काही कारणाने -उदा. ब्लड प्रेशर- बाळाची वाढ आणि पाणी दोन्हीही कमी असते. अशा वेळी बाळाची सहन करण्याची ताकद कमी असते. कळा सुरू झाल्या की लगेच बाळाचे ठोके खाली येऊ लागतात. या दोन्ही प्रकारात खूप काळजीपूर्वक निर्णय घेऊन वेळीच सिझेरियन केले नाही तर बाळाच्या जीविताला धोका होऊ शकतो.

बाळाचे ठोके अनियमित होणे:-

यामध्ये दोन प्रकारची अनियमितता असू शकते.
पहिल्या प्रकारात बाळाचे ठोके कमी होऊन लगेच वाढतात आणि बाळाच्या ठोक्यांचे प्रमाण पूर्ववत येते. डिलिव्हरीची वेळ अगदी जवळ असताना बाळाच्या डोक्यावर दाब पडल्याने हे होऊ शकते.
अशा वेळी प्रसूतीतज्ज्ञांना हे माहीत असल्याने रुग्ण व्यवस्थित प्रसूत होतात.
दुस:या प्रकारात बाळाचे ठोके अनियमित होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदा.
नाळेचे वेढे असणे.
ऑक्सिजन कमी पडल्यामुळे बाळाने शी केलेली असू शकते. अशा वेळी नॉर्मल डिलिव्हरीसाठी थांबणो धोकादायक आहे. हातचे बाळ आपण गमावू शकतो.

बाळाने पोटात शी करणो :

सर्वसामान्यपणो बाळ आईच्या पोटात शू करत असते व गर्भजल पीत पण असते. गर्भजल जंतुविरहीत असल्याने यात धोका नसतो.
कळा सुरू झाल्यावर कळांच्या दबावामुळे बाळाला ऑक्सिजन कमी पडल्यास बाळ शी करते. हे शी केलेले गर्भजल बाळाच्या एकवेळ पोटात गेले तर फार मोठी समस्या नसते पण ब:याच वेळा बाळ हे गर्भजल श्वसनमार्गात ओढून घेते. मग मात्र फारच बिकट समस्या उभी राहते. अशी बाळे जन्माला येताना श्वास नीट घेऊ शकत नाहीत. शी केलेले गर्भजल त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन दाह निर्माण करते. अशी बाळे लगेच नवजात अतिदक्षता केंद्रात दाखल करावी लागतात आणि हा आजार बाळाचे प्राण घेऊ शकतो.
- वरील मुद्यांवरून स्त्रीरोगतज्ज्ञ रोज किती तारेवरची कसरत करत असतात हे लक्षात येईलच आणि हे फक्त चार मुद्दे आहेत. एका पेशंटची प्रसूती करताना असे अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.
स्त्रीरोगतज्ज्ञांवर सारखे सिङोरियन करतात म्हणून आरोप करणारे एखादी गुंतागुंत झाल्यास वेळेवर सिङोरियन का केले नाही म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञांवर धावून जातात. हे सगळे समाजातल्या सर्व स्तरांनी समजून घ्यायची गरज आहे. आज बहुतेक स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ असे आहेत की, प्रॅक्टिस सुरू केल्यापासून गेले 1क्-2क्-3क् वर्षे एकही रात्र पूर्णवेळ झोपलेले नाहीत. कोणत्याही वेळी, स्वत:ची सुखदु:खे बाजूला ठेवून आम्ही पेशंटच्या मदतीला धावून जात असतो. तुम्ही म्हणाल ‘मग आम्ही त्याचे पैसे  मोजतो’ पण खरे सांगा, पैसे देऊन सुद्धा किती क्षेत्रमध्ये लोक स्वत:ला विसरून रात्रंदिवस काम करून पेशंटचा आणि बाळाचा जीव वाचवतात? अशा गोष्टी पैशात मोजता येतात का?
अजूनही या देशातल्या हुशार मुलांना डॉक्टर बनण्याची थोडी फार आस आहे पण दिवसेंदिवस डॉक्टरांवर होणारे हल्ले, आर्थिक घडी बसायला लागणारी अनेक वर्ष, सतत कामाचा ताण, अनियमित वेळा या गोष्टींमुळे तरुण पिढी विशेष करून ‘स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रंकडे’ पाठ फिरवत आहे.
समाजाने आम्हाला समजून घेतले नाही तर भविष्यकाळात कुशल आणि हुशार स्त्रीरोगतज्ज्ञांची संख्या रोडावतच जाईल आणि यात सर्वात जास्त नुकसान सामान्य रुग्णाचे असेल.

No comments:

Post a Comment