Sunday, 5 February 2017

मृत्यूपत्र

मृत्यूपत्र

मृत्युपत्र (विल) म्हणजे काय?

कायदेशीर भाषेत विल म्हणजे विल करणार्या माणसाने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे काय करायचे यासंबंधी प्रदर्शीत केलेली इच्छा किंवा इच्छेची उद्घोषणा. थोडक्यात विल म्हणजे एखादया माणसाने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे व्हावे यासंबंधीचा केलेला दस्तऐवज. हे वाटप करताना त्याच्या इच्छेबरोबरच त्याला आयुष्यात आलेले अनुभव, त्याचा दृष्टीकोन, त्याचे तत्वज्ञान या सार्या गोष्टींचा सामान्यतः प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे तो वाटप ठरवतो. ते करताना तो काही नातेवाईकांना वगळू शकतो, काहींना त्यांच्या कायदेशीर हक्कांपेक्षा कमी किंवा जास्त देऊ शकतो. त्याचप्रमाणे नातेवाईकांना कुणाला काहिही न देता तो सगळी मालमत्ता एखाद्या संस्थेला दान करु शकतो किंवा त्याचा ट्रस्ट बनवू शकतो. अगदी त्याच्या वारसांना त्यांच्या हक्काप्रमाणे जरी द्यायचे असले तरी विल केल्याने गैरसमजाला किंवा संदिग्धतेला वाव राहात नाही. इथे आपण फक्त सर्वसाधारण विलचाच विचार करत आहोत.

मृत्यूपत्र कोण करु शकतो?

जिचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे अशी कोणीही सज्ञान व्यक्ती तिच्या स्वतःच्या मालमत्तेसंबंधी विल करु शकते. लहान मूल किंवा जिचे मानसिक संतुलन ढळले आहे अशी व्यक्ती मृत्यूपत्र करु शकत नाही.

१. कायद्यानुसार १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती

२. मानसिकदृष्टया आरोग्यवान असलेल्या व्यक्ती

३. ज्यांच्याजवळ संपत्ती आणि जीवन विमा पॉलिसी आहे त्यांनी मुख्यत्वे आपले मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे.

४. एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र लिहिले तरी ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत संपत्तीवर त्या व्यक्तीचाच अधिकार राहतो.

५. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याची संपत्ती त्याच्या उत्तराधिका-याला मिळते

मृत्यूपत्र लिहिताना

आपल्या स्थावर मिळकतीचे/ सदनिकेचे हस्तांतरण व नोंदणी आपण धडधाकट व आरोग्यसंपन्न असताना होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मृत्युपत्रदेखील आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित असताना करणे गरजेचे आहे. मृत्युपत्र हे वय वष्रे ३५ ते ४० पर्यंत करणे सद्यस्थितीत उचित ठरेल.

मृत्युपत्र लिहिताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या :-

१. संपत्तीची यादी :-

सर्वात प्रथम आपल्या सर्व संपत्तीची एक यादी करा. चल-अचल संपत्तीची माहिती, सर्व विमा पॉलिसी,यांचा समावेश त्यात असावा.

२. उत्तराधिका-यांची यादी :-

मृत्युपत्रात तुम्हाला ज्यांना संपत्तीचे वाटप करायचे आहे, अशा व्यक्तींची एक यादी तयार करा.

३. संपत्तीची निश्चितीकरण :-

कोणती संपत्ती कोणाला देणार आहात आणि कोणत्या हेतूने देणार आहात हे निश्चित करणे गरजेचे आहे. हे निश्चितीकरण करताना भविष्यातील विचार करणे आवश्यक असते. दबावाखाली येऊन मृत्युपत्र करणे चुकीचे आहे.

४. उत्तराधिका-यांचे टॅक्स प्लॅनिंग :-

मृत्युपत्रात तुम्ही ज्या व्यक्तींना आपल्या संपत्तीचे अधिकार देणार आहात त्यांना त्या संपत्तीवर वर्तमानात आणि भविष्यात किती टॅक्स भरावा लागेल याचा अंदाज घेऊन मृत्युपत्र लिहावे लागेल. असे केल्यामुळे भविष्यात तुमची संपत्ती ज्याला मिळेल त्याला कमीत कमी टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी तुम्ही इस्टेट प्लॅनिंगमधील तज्ज्ञ, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर यांची मदत घेऊ शकता.

५. मृत्युपत्र कशावर लिहावे? :-

मृत्युपत्र साध्या कागदावरही लिहू शकता; ते स्टॅम्प पेपरवर किंवा कायद्याच्या कागदांवर लिहावे लागते असे नाही.

६. मृत्युपत्र टाइप करावे? :-
कायदेशीरदृष्टया मृत्युपत्र हाताने लिहू शकता किंवा ते टाइप करू शकता. परंतु मृत्युपत्र योग्य प्रकारे वाचता यावे

No comments:

Post a Comment