Tuesday, 14 February 2017

मोफा कायद्यांतर्गत बांधकाम व्यावसायिकाने बांधकामास आवश्यक असलेल्या

मोफा कायद्यांतर्गत बांधकाम व्यावसायिकाने बांधकामास आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या ह्यांच्या प्रमाणित प्रती सदनिका खरेदी करणारास देणे आवश्यक असून तसे declaration / true disclosure करणे बंधनकारक आहे. त्या दृष्टीने हि केस  हा केवळ मोफा कायद्यांतर्गत गुन्हा नसून IPC कलम 420 अंतर्गत सुद्धा फसवणुकीचा गुन्हा ठरतो. *ह्या विषयी खालिल बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागृती होणे आवश्यक आहे,  त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न करीत आहे.*
१. बिल्डरला टोकन रक्कम दिल्यानंतर करावयाच्या कराराची, तसेच इतर बाबतीत (बिल्डरच्या वकिलाचा सर्च रिपोर्ट उपलब्ध असला तरीही) आपल्या वकिलाचा स्वतंत्र रिपोर्ट घ्यावा
२) हा सर्च रिपोर्ट किमान 13 वर्षे किंवा 31 वर्षे घेणे आवश्यक आहे.
३) 13 वर्षे का? - कोणतीही  जमिन एखाद्या बॅंकेस कर्जाचे तारण म्हणून गहाण ठेवलेली असल्यास त्याचा limitation period हा 12 वर्षे असतो.
४) 31 वर्षे का? - कोणत्याही सरकारी देय रकमेचा limitation period हा 30 वर्ष असतो. त्यामुळे सरकार / निमसरकारी संस्था त्या कालखंडात करांचे वसुलीसाठी केव्हाही सदरील अचल मालमत्ता ताब्यात घेऊन तिचा लिलाव करू शकतात.
५. सदनिका खरेदी  संदर्भातील कोणताही करारनामा हा करारनामा केल्यानंतर जास्तीत जास्त चार महिन्यांचे आत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणीकृत करणे आवश्यक असते.
६. मोफा कायद्यांतर्गत सदनिकेच्या खरेदी किमतीच्या जास्तीत जास्त 20% पर्यंत (म्हणजे 20% च नव्हे) रक्कम दिल्यावर Agreement for Sale ह्या कारारनाम्याची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*ह्या सर्व गोष्टी बँकेत कर्जासाठी प्रकरण सादर करताना आधीच केलेल्या असतील तर ग्राहकाचे नंतर लाखो रुपयांचे होणारे संभाव्य  नुकसान टाळता येऊ शकेल असा माझा अनुभव आहे.      ७) आपण लाखोंची प्रॉपर्टी घेतो, त्यात जवळपास आयुष्याची कमाई गुंतावतो (किंवा घालवतो) त्यासाठी किमान काळजी घ्यायची कि नाही? दररोजच्या जीवनात भाजी घेत असताना भाजिवाल्याशी आपण त्याने सांगितलेल्या भावाशी (समजा मेथीची जुडी) हुज्जत घालून भाव कमी करण्याचा प्रयत्न करतो, ती भाजी ताजी आहे की नाही हे चाणाक्षपणे सर्वांगाने पाहतो. मग हाच चाणाक्षपणा लाखो रुपयांची सदनिका घेतांना आपण कोठे गहाण टाकतो? प्रश्न हा आहे की - ह्या बाबतीत केवळ, "विचार किंवा विचारमंथन" इथपर्यंतच आपण सदैव  मर्यादित रहायचे का?*
आपण काय करू शकतो? वैयक्तिक आणि सामूहिक रित्या. पाहू या.

No comments:

Post a Comment