Tuesday, 14 February 2017

हॉलीडे पॅकेजच्या नावाखाली 60 लोकांची 30 लाखांनी फसवणूक

हॉलीडे पॅकेजच्या नावाखाली 60 लोकांची 30 लाखांनी फसवणूक


पुणे, दि. 14 - वीस हजार रुपये भरल्यानंतर पंचतारांकीत हॉटेलमध्ये 14 दिवस 13 रात्र राहण्यासोबतच धानोरी येथील एका जिममध्ये 1 महिन्यासाठी सभासद अशा प्रकारच्या हॉलीडे पॅकेजचे आमिष दाखवून पुणे शहरातील 60 लोकांची तब्बल 30 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी हडपसर येथून एकाला अटक केली आहे. 
राकेश रामब्रिज वर्मा (वय-28, रा.संगम सोसायटी, हडपसर, पुणे), असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धानोरी येथे राहणारे खन्ना यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करत जुकासो नामक कंपनीचा 25 वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने विमाननगर येथील फॉर्च्यून हॉटेलमध्ये 45 मिनिटांचा सेमिनार आहे. त्यानंतर जेवण आणि काही फ्री गिफ्ट देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार खन्ना हे त्या ठिकाणी गेले असता द हाऊस ऑफ व्हेकेशन्स या कंपंनीचे मालक आरोपी राकेश शर्मा त्या ठिकाणी भेटले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीचा जुकासो हॉटेल्स व इतर पंचतारांकित हॉटेल्सबरोबर करार आहे. यानंतर त्यांचा मॅनेजर संदीप कनोजिया याने खन्ना यांना वेगवेगळ्या हॉलीडे पॅकेजसंबंधी माहिती दिली.

त्यानंतर खन्ना यांनी 20 हजार रुपये भरत एक पॅकेज निवडले. परंतू अद्यापही त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा न देता त्यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

No comments:

Post a Comment