Lokshahi Deen लोकशाही दिन - Grahak Margdarshan

STAY CONNECTED

Lokshahi Deen लोकशाही दिन



सन 1999 पासून शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा-1099/सीआर-23/99/18-अ दि.29/12/99 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन आयोजित करण्यात येत होता. सदर लोकशाही दिनांत नागरिंकाचे तक्रारीचे निवारण झाले नाही तर जनतेला न्याय मिळण्यासाठी शासन परिपत्रक क्र.प्रसूधा/1001/प्र.क्र.70/2001/18-अ दि.10/11/2001 अन्वये मंत्रालय लोकशाही  दिन मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे.
त्यानंतर सदर कार्यपध्दतीत सुधारणा होऊन शासन परिपत्रक क्र. प्रसूधा/1002/सीआर-69/2002/18-अ दि.22/7/2002 अन्वये महिन्याच्या दुस-या सोमवारी विभागीय स्तरावर मा.विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संबधितीतील नागरिकांचे तक्रारीचे निवारण जलद गतीने होण्यासाठी शासन परिपत्रक क्र.महालो/1007/212/प्रक्र 53/07/18-अ दि.7/11/2007 अन्वये बृहन्मुंबई,पुणे व नागपूर या महानगरपालिका प्रमाणेच उर्वरित सर्व महानगरपालिकांमध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.सदर दिवशी अर्जदार यांनी त्यांची तक्रार लोकशाही दिनी स्वत:सादर करावयाचे असतात.
शासन परिपत्रक क्र प्रसूधा-2011/प्रक्र 189/11/18-अ दि.26/9/2012 अन्वये तालूका / जिल्हा / महानगरपालिका / विभागीय / मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत