Sunday, 18 September 2016

PAN Card वरील चुका दुरुस्ती करण्यासाठी फॉलो करा -5 सिम्पल स्टेप्स

PAN कार्ड हे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पण, घाईगडबडीत फॉर्म भरल्याने पॅन कार्डमध्ये काही चुका राहून जातात. आधी या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत होते. आता पॅॅन कार्डवरील चुका दुरुस्त करणे खूप सोपे झाले आहे.

विषेश म्हणजे यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेर्‍या मारण्याचीही गरज भासत नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ही पॅन कार्डवरील चुका दुरूस्त करू शकतात. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Step-1:

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या या साइटवर लॉगइन करावे.
इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या पॅन कार्ड करेक्शनच्या साइटवर https://tin.tin.nsdl.com/pan/correction.html वर लॉगइन करावे. पॅन कार्डवरील चुका दुरुस्त करण्‍यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा.

Step - 2 यात करू शकतात करेक्शन

तुम्ही नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो व सिग्नेचरशी (स्वाक्षरी) संबंधित चुका दुरस्त करू शकतात. इतकेच नव्हे तर तुमचे पॅन कार्ड जुने झाले असेल तरी तुम्ही ते कार्ड बदलून नवे पॅनकार्ड बनवू शकतात. अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Step - 3 शुल्कही भरा ऑनलाइन

पॅन कार्डमध्ये करेक्शन करण्‍याची माहिती भरल्यानंतर तुम्हाला 107 रुपये शुल्क अदा करावे लागेल. तुम्हाला हे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंगद्वारे तुम्ही शुल्क भरू शकतात.

Steps-4: ही डॉक्युमेंट्स आवश्यक...
शुल्क अदा केल्यानंतर तुम्हाला एक एकनॉलेजमेंट फॉर्म ऑनलाइन मिळेल. त्याची प्रिंटआउट घेवून त्यावर एक कलर फोटो (व्हाइट बॅकग्राउंड) चिकटवा. फोटोखाली स्वत:ची स्वाक्षरी करावी व खालीलपैकी कोणतेही दोन डॉक्युमेंट्स जोडून पुणे ऑफिसच्या पत्त्यावर एक आठवड्याच्या आत पाठवून द्यावा.
1. शालांत (दहवी) परीक्षेचे सर्टिफिकेट,
2. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
3. पासपोर्ट
4. व्होटर आयडी कार्ड
5. ड्रायव्हिंग लायसन्स
6. रेशन कार्ड
7. आधार कार्ड
8. फोन बिल
9. बँक पासबूक
10. वीज/पाणीचे बिल
11. क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट
12. एम्प्लॉयर सटिर्फिकेट

स्टेप-5: या पत्त्यावर पाठवा अर्ज

इनकम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिट, पाचवा मजला, मंत्री स्टर्लिंग, प्लॉट क्रमांक. 341, सर्व्हे क्रमांक 997/8, मॉडल कॉलनी, दीप बंगला चौकजवळ, पुणे-16
Source : Divya Marathi - http://bit.ly/2cvN53N
#PanCard #Incometax

No comments:

Post a Comment