Saturday, 27 August 2016

सिलेंडरच वजन तपासून घेण आवश्यक

आपल्याला सरासरी प्रत्येक महिन्यासाठी किमान एक सिलेंडर लागतोच. त्यासाठी आपण सिलेंडर बुक करून घरपोच मागवून घेतो. सिलेंडर च्या किंमती सोबतच आपण वितरकाने आपल्याला  घरपोच  सेवा दिली म्हणून वर आगाऊ ३० ते ५० रु. हि देतो... 

👉🏻आपल्या पैकी किती जणांना माहित आहे कि *ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी ग्यास कंपन्या तर्फे  वितरकांना त्यांच्या ठरलेल्या मार्जीन व्यतिरिक्त  ५० रु. प्रत्येक सिलेंडर मागे आगाऊ दिले जातात.* (अर्थात आपल्याच खिशातून) मग परत वरून ५० रु आपण का मोजायचे?

👉🏻प्रत्येक ग्राहकाडून प्रत्येक महिन्याला ३० ते ५० रु. असे साधारण २० ते २५ हजार ग्राहक जर असतील तर तुम्हीच हिशोब लावा.

👉🏻आजकाल सबसीडी डायरेक्ट बँक खात्यात जमा होत असल्याने ग्यास वितरकांच्या काळ्या धंद्यात बरीचशी घट झाली आहे त्याचा परिणाम आपल्या  सिलेंडर मधून ग्यास चोरून काढन्या पर्यंत काही वितरकांची मजल गेली आहे. त्यामुळे आज आपल्याला मिळनार्या प्रत्येक सिलेंडरच वजन तपासून घेण आवश्यक आहे.

👉🏻रिकाम्या सिलेंडरच वजन १५.३ किलो आणि त्यातील ग्यास च वजन १४.२ किलो अस मिळून भरलेल्या सिलेंडरच वजन २९.५ किलो असायला हव .

👉🏻 *डीलेवरी देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडे वजन काटा असणं बंधन कारक आहे.*

👉🏻साधी १० रु. ची भाजी घेताना आपण एकटक त्या काट्याकडे बघत असतो तर ५००-६०० रु. ची  वस्तू घेताना आपण कस काय गाफील राहू शकतो?

👉🏻आज पासूनच सुरुवात करा म्हणजे इथून पुढच नुकसान तरी आपल्याला टाळता येईल.

👉🏻लक्षात ठेवा आपला घर ग्यास एजन्सी पासून कितीही दूर असो आपण घरातील / बिल्डींग मधील कुठल्या हि मजल्यावर राहत असू छापील बिलावर असणार्या किमती व्यतिरिक्त तुम्हाला वरी ऐक पैसाही देयची गरज नाही.

👉🏻डीलेवरी देणाऱ्या व्यक्ती जर वजन करून देत नसेल किंवा आगाऊ पैसे (घर पोहच दिल्या बद्दल ) जर मागेत असेल तर फक्त – *कंपनी ला फोन लाऊ का?* एवढेच म्हणून बघा तो चुपचाप बसेल कारण त्यांना सगळे नियम माहित असतात. नियम आपल्याला माहित नाहीत किंवा आपण माहित करून घेयची तसदी घेत नाहीत...

👉🏻एवढे करून हि जर तुमचा कुणी ऐकत नसेल तर खालील क्रमांकावर तक्रार करा :-
एच. पी. – १८०० २३३३ ५५५
भारत – १८०० २२ ४३४४ 
इंडेन – १८०० २३३ ३५५५

No comments:

Post a Comment