Wednesday, 1 June 2016

रेशनिंगचे नियम

 रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात
  • रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
  • बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.
  • बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.
  • रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
  • एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
  • ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. 
  • इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.
  • रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.
  • रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. 
  • आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. 
  • आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.
  • रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. 
  • या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड222483या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.
  • वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. 
  • जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. 
  • तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.
  • दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. 
  • ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. 
  • तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.लेखी तक्रार तहसिलदार किंवा रेशन ऑफिसर यांच्‍याकडेही करता येते.


Sourced From: Dr. Yogesh H.Surtyawanshi

No comments:

Post a Comment