Friday, 13 May 2016

घरपोच सिलेंडर च्या दरवाढीस ग्राहक पंचायतीचा विरोध

घरपोच सिलेंडर च्या दरवाढीस ग्राहक पंचायतीचा विरोध

घरपोच सिलेंडरचे सेवेचे दर वाढणार असल्याने त्यासाठी ग्राहकांकडून हरकती मागवलेल्या आहेत. यासाठी ग्राहकांनी देखिल आपल्या हरकती जिल्हा पुरवठा खात्याकडे नोंदवाव्यात असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेले असून या संभाव्य  दरवाढीच्या मागणीला विरोध करित आहे. त्या ऐवजी सेवेत सुधारणा करावी अशी मागणी करित आहे. दरवाढ का करू नये त्याची कारणे पुढील प्रमाणे -
१) आज ग्राहकांना त्यांना वितरकाकडून मिळणाऱ्या सदोष सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे.
२)आजही बुकिंग केल्यावर देखिल सिलेंडर ४ते५ दिवसानंतर वितरकाची मनधरणी करून मिळते.
३) ग्राहकांना वापरलेले सिलेंडर मिळणे.
४) ग्राहकाला सिलेंडरचे वजन करून न देणे.
५) आणलेले सिलेंडर दरवाज्यात ठेवणे. ते घरात न आणणे.
६) ग्राहकाशी अरेरावी करणे.
७) ग्राहकाने दिलेल्या पैशातून उरलेले पैसे त्याला परत न करणे.
८) गँस सिलेंडर नोंदणी पुस्तक ग्राहकाला मुळ किंमतीपेक्षा डबल किंमतीत विकणे.
असे ग्राहक पंचायतीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आलेले आहे.
ग्राहक पंचायत या निमित्ताने शासनाला असे सुचवू इच्छिते की,
१) वितरकांना कार्यक्षेत्राबाहेरचे ग्राहक करू देऊ नये. त्या ऐवजी तेथे असणाऱ्या दुसऱ्या वितरकाला जोडून द्यावे म्हणजे वितरण खर्च कमी होईल.
२) शासनाने वितरकाकडे किती ग्राहक असावे याची संख्या निश्चित करावी.
३) वितरक व त्यांचे सहकारी यांची सेवा ग्राहकाभिमुख कशी करता येईल यासाठी त्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे यासाठी ग्राहक पंचायत केव्हाही मदतीस तयार आहे.


विजय मोहरीर
अशासकीय सदस्य- ग्राहक संरक्षण परिषद, (म.शासन)
विभाग सहसंघटन मंत्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र
विजय मोहरीर
ग्राहक संरक्षण विषय अभ्यासक

No comments:

Post a Comment