मा.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी - Grahak Margdarshan

STAY CONNECTED

मा.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी

ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष मा.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांचा आज प्रथम स्मृतिदिन यानिमित्ताने त्यांच्या अतुलनीय कार्याचा मोजक्या शब्दात घेतलेला आढ़ावा.....🐾 🌺   

   💐💐सन १९७४ साली पुण्यातुन जन्मलेली चळवळ  पाहता पाहता देशव्यापी बनली। लोकमान्यता समाजमान्यता आणि राजमान्यता लाभलेल्या या चळवळीच नाव "ग्राहक पंचायत"।नावातच एक बिंदु सामावलेल्या बिंदुमाधव या ध्येयवेड्या पण दूरदृष्टी लाभलेल्या माणसान जयप्रकाश नारायण आणि न्या.महम्मद करीम छागला यांच्या हस्ते या चळवळीच्या लोकयात्रेला प्रारंभ केला।विशुद्ध चारित्र्य प्रखर राष्ट्रभक्ति संघशरण जीवन हिंदू विचार दर्शनाचे गाढे अभ्यासक सिधह्स्त लेखक प्रभावी वक्ता कुशल संघटक आणि थोर स्वातंत्रय सेनानी असे सर्व गुण संपन्न असलेल एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे ग्राहकांच्या लोकचळवळीचे प्रणेते "बिंदुमाधव बटुकभेरव जोशी".

८०० वर्षा हुन अधिक वर्ष पुण्यात वास्तव्य करीत असलेल्या पुण्यक आणि उपाध्यायी जोशी घराण्यात २५ डिसेंबर १९३१ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल बटुकभेरव हे योगाभ्यासी आणि लोकमान्य टिळक यांचे ते शिषय होते. त्यांचे पणजोबा वेदांतसूर्य यांच्या पासून सुरु झालेली योगसाधनेची परंपरा बिंदुमाधव यांनी अखेरच्या श्वासापर्यन्त जपली. ग्राहक चळवळीला भारतीय सिधांताची वैचारीक बैठक देवून त्यांनी एक देशव्यापी संघटना बांधली. वन लाइफ़ वन मिशन हे जीवनसूत्र मानून वयाच्या ८५ व्या वर्षी (१० मे२०१५)घेतलेल्या अखेरच्या श्वासापर्यंत  ग्राहक राजाला राजापद बहाल करण्यासाठी प्रकुर्तिची पर्वा न करता त्यांनी दिलेला लढा असंख्य कार्यकर्त्यांना आज ही प्रेरणा देतो.

ग्राहक चळवळ गावोगावी पोहोचविन्यासाठी गांव तिथ ग्राहक पंचायत हा संकल्प घेवुन त्यांनी तब्बल दोन वेळा संपुर्ण भारताची परिक्रमा केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी ग्राहक हिताच्या धोरण विषयी चर्चा करुन ग्राहक कायदा होण्याची गरज पटवून दिली आणि त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव् गांधी यांच्या कार्यकाळात २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा संसदेने मंजूर केला. या कायद्याच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक तक्रार निवारणआयोगा ची स्थापना करण्यात आली. १९९४ ते १९९९ या युती सरकारच्या कार्यकलात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडलात बिंदुमाधव जोशी यांना ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी क्याबिनेट मंत्र्याचा दर्जा ही देण्यात आला. त्यांनी ही काही अटी घालून १२ जाने।१९९६ साली स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी हे पद स्विकारल. या चार वर्षाच्या कार्यकालात शासकीय स्तरावर ग्राहक चळवळीसाठी का्य करता येते याची अनेक आदर्श उदाहरने घालून दिलीच पण स्वराज्यात भारतीय प्रशासनाचे कार्य कसे केले पाहिजे याच ही नवा मार्ग भारतीय प्रशासना समोर ठेवला. दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम मधेही त्यांनी घेतलेला सहभाग हा इतिहासात महत्वपूर्ण ठरला. उत्पादनात वाढ वितरणात समानता आणनि उपभोगावर संयम या भारतीय सिधान्तावर ग्राहक चळवळी चा पाया त्यांनी उभा केला आणी खरया अर्थाने बाजारपेठेचा मुलाधार असलेल्या ग्राहकाला राजपद बहाल करण्याचे नवोन्मेशा चे कार्य आपल्या उभ्या संघर्षमय आयुष्यात सार्थ केले. त्यांच्या या सुराज्य निर्मीतिच्या या कार्याची दखल घेवुन सामाजिक न्याय ; फ़ाय फ़ोंडेशन ; यान्द्य्व्ल्क्य तर भारतीय मर्चंट चेंबर्स चा अमृत आशा अनेक पुरस्कारानी सन्मानीत केले आहे. तर सम्पूर्ण भारतातील समाजशरन वृत्तीने हे ग्राहक चळवळीचे कार्यकरणार्या लाखो कार्यकर्त्यांनी त्यांना "ग्राहकतीर्थ" ही उपाधि बहाल करून त्यांचा व् त्यांच्या कार्याचा सन्मान केला.

गेल्या तीन  दशका पासून आद. नानां च्या प्रेरनेतुन सुरु झालेल हे कार्य  त्यांचा आदर्श समोर ठेवून समाजशरण वुत्तिच्या व्रतधारी कार्यकर्त्यांकडून आजही सुरु आहे व् अखंड पणे सुरु राहणारे आहे.  फक्त त्याला जोड़ हवी निस्वार्थ त्यागाची. आपणा सर्वां कडून एवढीच माफक अपेक्षा  व्यकत करून आद.नानांना आजच्या प्रथम स्म्रुतिदिनी वाहतो ही शब्दसुमनांजली ।।वंदेमातरम।।